Share

यूपीत आता रस्त्यावर धार्मिक कार्यक्रमांना बंदी; योगी आदित्यनाथांचा मोठा निर्णय!

Published On: 

लखनौ : उत्तर प्रदेशमधील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाई केली. आता योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यूपीमध्ये रस्त्यांवर कुठलेही धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे उत्तर प्रदेश सरकारी प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे.

“रस्त्यांवर कोणतेही धार्मिक कार्यक्रम घेण्यास कोणतीही परवानगी देऊ नका. अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम हे संबंधित धार्मिक स्थळांमध्येच व्हायला हेवत, रस्त्यावर नाही,” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात मनसेच्या गुढी पाडवा सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय काढत ते उतरवले गेले पाहिजेत अन्यथा त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. याचे पडसाद देशभरात उमटले होते. भाजपने राज ठाकरेंच्या या भूमिकेचं समर्थन केलं होतं. यानंतर उत्तर प्रदेशात योगी सरकारनं हिंदु-मुस्लिमांसह सर्वच धार्मिक स्थळांवरील लाखो अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली होती.

योगींच्या या भोंगे कारवाईवचं स्वागत झालं होतं. त्यानंतर आता रस्त्यावर धार्मिक कार्यक्रम होता कामा नये अशी भूमिका त्यांनी मांडली असून तसे स्पष्ट निर्देशही संबंधित प्रशासनाला त्यांनी दिले आहेत. त्यामुळे इथून पुढे उत्तर प्रदेशात रस्त्यावर धार्मिक कार्यक्रम होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!