🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर (SRH vs RCB) ६७ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रविवारी (८ मे) रंगेलल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात बंगळुरुचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत हैदराबादला १९३ धावांचे आव्हान दिले. विराट कोहली पुन्हा गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी केली आणि दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात वानिंदू हसरंगाच्या पाच बळींमुळे हैदराबाद संघ १२५ धावांत आटोपला. त्यांच्याकडून राहुल त्रिपाठीने अर्धशतकी झुंज दिली. या विजयासह बंगळुरूने मागच्या दारुण पराभवाचा वचपा काढला आहे. हैदराबादविरुद्ध आरसीबीचा संघ ६७ धावांवर ऑलआऊट झाला होता.
हैदराबादचा डाव
बंगळुरूच्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन या दोन्ही सलामीवीरांना शून्यावर गमावले. त्यानंतर फिरकीपटू वानिंदू हसरंगाने आपल्या जाळ्यात हैदराबादच्या पाच फलंदाजांना अडकवले. एडन मार्कराम (२१), निकोलस पूरन (१९), जगदीश सुचित (२), शशांक सिंग (८) आणि उमरान मलिक (०) यांना हसरंगाने फसवले. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने अर्धशतक ठोकले, पण त्य़ाला दुसऱ्या बाजूने साथ लाभली नाही. हैदराबादचा डाव १९.२ षटकात १२५ धावांवर आटोपला. बंगळुरूकडून हसरंगाने १८ धावांत ५ बळी घेतले.
Brilliant performances with the bat and ball. ✅
2️⃣ points in the bag. ✅A #GoGreen Game we will remember for a long time to come. ????#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #ForPlanetEarth #SRHvRCB pic.twitter.com/ZcjkqKDkTW
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 8, 2022
बंगळुरूचा डाव
विराट कोहली यंदाच्या मोसमात पुन्हा हैदराबादविरुद्ध आणि एकूण तिसऱ्यांदा गोल्डन डकवर बाद झाला. हैदराबादचा फिरकीपटू जगदीश सुचितने विराटला केन विल्यमसनकरवी पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. त्यानंतर कप्तान फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी शतकी भागीदारी रचत दबाव दूर केला. पाटीदारने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या, सुचितनेच त्याला बाद केले. डु प्लेसिसने अर्धशतक ठोकत ग्लेन मॅक्सवेलसह डाव पुढे नेला. ३ चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावांची खेळी करून मॅक्सवेल १९व्या षटकात बाद झाला. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने वेगवान गोलंदाज फजलहक फारूखीला लागोपाठ ३ षटकार ठोकत फिनिशरला साजेशी खेळी केली. कार्तिकने ८ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह नाबाद ३० धावा केल्या. तर डु प्लेसिसने ८ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७३ धावा केल्या. २० षटकात बंगळुरूने ३ बाद १९२ धावा केल्या.
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंह, जगदीशा सुचित, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
