नाशिक : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.
अशात नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चक्कर येऊन रुग्ण दगावण्याच्या घटना नाशिकमध्ये पुन्हा समोर आल्या आहेत. भोवळ येऊन नाशकात वेगवेगळ्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे चक्कर येऊन मृत्यू होत असल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला तोंड देत असताना नाशकात नवं संकट उभं राहिलं आहे.
अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा एका दिवसात 11 वर गेला आहे. गेल्या आठवड्यात 13 जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाला होता. 15 एप्रिल रोजी एका दिवसात 9 जणांना चक्कर येऊन प्राण गमवावे लागले होते, तर त्याआधी चौघे मृत्युमुखी पडले होते. म्हणजेच दोन आठवड्यात 24 जणांनी चक्कर आल्याने जीव गमावले. विशेष म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाला राहत्या घरीच चक्कर आली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यातले सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे आता कॉग्रेससुद्धा बोलू लागली आहे’
- भोरमधील तीनशे वर्षांची परंपरा खंडीत, श्रीराम जन्मोत्सव सलग दुसऱ्यांदा रद्द
- नागरिकांचा निष्काळजीपणा सुरूच; केज तालुक्यात केली विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
- सामनावीर अमित मिश्राने उलगडला त्याचा ‘सक्सेस मंत्र’
- शरद पवार पुन्हा रुग्णालयात,शस्त्रक्रियेनंतर आता प्रकृती स्थिर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

