मुंबई : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मुलायम सिंग यादव (Mulayam Singh Yadav) गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांचं निधन झालं असल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यादव गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलच्या (Mudanta Hospital) आयसीयूमध्ये होते. मुलायम सिंग यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी अनेक लोक रुग्णालयात पोहोचत होते.
तीन वेळा मुख्यमंत्री राहिले होते मुलायम सिंग यादव –
22 नोव्हेंबर 1939 रोजी यांचा जन्म झाला होता. मुलायम सिंग यांनी राम मनोहर लोहिया (Ram Manohar Lohia), राज नारायण (Raj Narayan) यांसारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण सुरु केलं होतं. 1967 मध्ये यादव विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 1989 मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. 1992 मध्ये यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर 1993 मध्ये ते दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. तसेच 2003 साली यादव तिसऱ्यांदा आणि शेवटच्या वेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाले.
२०१२ साली प्रचंड चर्चेत आले होते मुलायम सिंग यादव –
2012 साली यादव प्रचंड चर्चेत आले होते. 2012 च्या प्रसिद्ध बलात्काराच्या घटनेनंतर भारतात बलात्काराबाबत कडक कायदा करण्यात आला होता. याला विरोध करत मुलंच चुका करतात, ती मुलं असतात, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला जगभरातून विरोध करण्यात आला होता.
दरम्यान, २ ऑक्टोंबर पासून यादव यांच्यावर उपचार सुरु होते. यावेळी त्यांच्या पत्नी डींपल यादव यांनी अनेकांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं. अनेक नेत्यांनी देखील यादव यांना भेट दिली होती. मात्र, आज त्यांनी मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire | शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल
- Shivsena | “… म्हणून काही गारद्यांना शिवसेनेवर घाव घालण्याची सुपारी दिल्लीने दिली”; शिवसेनेचा थेट आरोप
- Shivsena । कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच!
- Uddhav Thackeray | “उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे”
- Eknath Shinde । कुणीही कायदा हातात घेऊ नका; मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेची मंत्री आणि आमदारांना सूचना


