🕒 1 min read
लखनऊ : उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फेसबुक मेसेज द्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी त्यांना पहिल्यांदा आली नसून अकरावी वेळ आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आता यावर तपास सुरू आहे.
योगी आदित्यनाथ यांना फेसबुकवरुन धमकीः
फेसबुक वर मुरादाबाद पोलिसांच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करण्यात आलं. तसेच या अकाऊंटवरुन योगी यांना धमकी देणारी पोस्ट आत्मप्रकाश पंडित नावाच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र त्यांचं अकाउंट हॅक करून कोणीतरी हे काम केलं असल्याचं आत्मप्रकाश पंडित यांनी म्हटलं आहे.
पेजवर पाकिस्तानचा झेंडाः
ज्या पेजवर मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यात आली आहे त्या पेजवर पाकिस्तानचा झेंडा आहे. त्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचाही फोटो आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री योगी यांना अकरावी वेळ ही धमकी आली आहे. तसेच धमकी प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आलं असून या क्रमातील पहिली धमकी 24 एप्रिल 2020 रोजी देण्यात आली होती. मात्र तेव्हापासून ही धमक्यांची मालिका सुरूच आहे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
मुंबई पोलिसांना देखील हल्याची धमकीः
दरम्यान, मुंबई पोलिसांना देखील पाकिस्तानमधून मुंबई वर हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. अशातच आता योगी यांना धमकी देण्यात आलेल्या पेजवर देखील पाकिस्तानचा झेंडा असल्याने दोन्ही धमक्यांमध्ये काही संबंध आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Girish Bapat| देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यावर गिरीश बापट यांची प्रतिक्रीया, म्हणाले…
- Sushma Andhare| “राजकरणातील महाभारत मध्ये देवेंद्र फडणवीस तर कलयुगातील धृतराष्ट्र”, सुषमा अंधारे यांचा घणाघात
- Kalicharan Maharaj | हिंदुत्ववादी नेत्यांची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली- कालीचरण महाराज
- Vinayak raut | “काही दिवसांपूर्वी पर्यंत हातभट्टी, मटका चालवणाऱ्या गद्दारांनी आता…”; विनायक राऊत कडाडले
- Gulabrao Patil | उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच तह केला असता तर आज ही वेळ आली नसती-गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
