Share

IPL 2022 CSK vs DC : गुरुनं टॉस गमावला..! चेन्नईची पहिली बॅटिंग; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ५५वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात होत आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा माजी कप्तान रवींद्र जडेजा संघाबाहेर असून शिवम दुबेला संधी मिळाली आहे. दिल्लीनेही केएस भरत आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान दिले आहे. दहापैकी सात सामने गमावून चेन्नई गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे दिल्लीने दहापैकी पाच सामने जिंकले असून ते पाचव्या स्थानावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची ही पहिलीच लढत आहे.

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसाठी आतापर्यंतचा हा मोसम काही खास राहिला नाही. पहिल्या आठ सामन्यांनंतर कर्णधारपदात बदल झाला, पण महेंद्रसिंह धोनीही शेवटच्या सामन्यात संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. फलंदाजीमध्ये एकसंध कामगिरी दिसत नाही. एका सामन्यात मोठी धावसंख्या दिसत असली तरी पुढच्या सामन्यात फलंदाज संघर्ष करताना दिसतात. ड्वेन ब्राव्होच्या अनुपस्थितीत, डेथ बॉलिंग देखील सामान्य दिसते. अशा स्थितीत प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी संघाला कोणत्याही स्थितीत चांगला खेळ दाखवून विजयाची नोंद करावी लागेल.

दिल्ली कॅपिटल्सची कामगिरीही सातत्यपूर्ण राहिली नाही. पण असे असूनही, संघाने काही सामने जिंकले आहेत. आज त्यांना सीएसकेविरुद्ध विजय नोंदवून आपले स्थान बळकट करण्याची संधी असेल. गेल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि रोवमन पॉवेल यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि या सामन्यातही त्यांच्याकडून अशीच कामगिरी करण्याची संघाला अपेक्षा आहे. फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजीत काही समस्या आहेत, जिथे शार्दुल ठाकूर फारसे काही करू शकला नाही. मात्र, एनरिक नॉर्कियाच्या आगमनाने संघाच्या वेगवान आक्रमणाला बळ मिळाले आहे.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोईन अली, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, महेश थिक्षना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.

दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्किया.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!