🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कावड यात्रा सुरू आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सरकारने कावड घेणून जाणाऱ्यांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. काही स्वयंसेवी संस्था कावड नेणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी कावड यात्रेच्या मार्गावर काम करत आहेत. त्यातच आता पतंजलीही कावड नेणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी पुढे आली आहे. रामदेव बाबा यांनी ट्विट करून फोटो शेअर करत लिहिले की, “पतंजली कावड सेवा, आजपासून पतंजली योगपीठ हरिद्वार येथे शिवरात्रीनिमित्ताने भक्तांसाठी, गायीच्या शुद्ध देशी तुपातील भंडारा (महाप्रसाद) आणि वैद्यकीय सेवा सुरु केली आहे. तसेच यज्ञ देखील करण्यात आलाय.”
रामदेव बाबा यांच्या या ट्विटवर काहींनी सकारात्मक कॉमेंट्स केल्या आहेत तर काहींनी ट्रोल केले आहे. एका युजरने कॉमेंट्समध्ये लिहले आहे की, “पेट्रोल 30 ते 35 रु. लिटरपर्यंत मिळेल, असे रामदेव बाबा म्हणाले होते. कदाचित रामदेव बाबा यांना भारत सरकार 30 ते 35 रु. लिटर पेट्रोल देत आहे म्हणून बाबांचे तोंड बंद झाले आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “तुमच्या विनंतीवरून आम्ही ज्यांना मत दिलं आहे, आता त्यांनीच दूध, दही, चीज, गहू, मैदा या सर्व गोष्टींवर कर लादला.”
पतंजलि कावड़ सेवा,
आज से पतंजलि योगपीठ हरिद्वार में शिवभक्तों के लिए शिवरात्रि तक चलने वाले गाय के शुद्ध देशी घी के भंडारे व चिकित्सा सेवा आदि सेवाकार्य का प्रारंभ यज्ञ के साथ किया गया। pic.twitter.com/1fHHBWl6RX— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) July 18, 2022
एका विद्यार्थ्याने लिहिले की, “परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही तुम्ही असेच भंडारे आयोजित करायला हवेत”. तर काहींनी लिहिले की, “बरोबर बाबाजी, इथेही प्रसिद्धी? तुम्ही योग्य व्यापारी आहात. गुड बाबा जी, पेट्रोलचे दर 35 रु कधीही होणार ते सांगा”. तर काही युजर्सनी लिहले की, ” तुम्ही या निरागस मुलांना समजावून सांगितले पाहिजे की या बकवासात पडू नका. पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहात.” अशाच प्रकारच्या कंमेंट्समुळे हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ashish Jaiswal : शिंदे-फडणवीसांची जोडी तेंडुलकर-कांबळी यांच्या सारखी; आशीष जैस्वालांच वक्तव्य!
- Pravin darekar | बाळासाहेब कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही – प्रविण दरेकर
- Jayant Patil | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त, राज्याला… – जयंत पाटील
- Nitesh Rane : तुम्ही गुंगीत होता, मग मुलगा दावोसमध्ये काय धिंगाणा घालत होता? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल!
- Prasad Lad | आजची मुलाखत म्हणजे बॅट पण माझी, बॉल पण माझा,अंपायर पण माझा ! – प्रसाद लाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

