🕒 1 min read
वाराणसी : कृषी कायद्यांच्या विरोधात सध्या पंजाब आणि परिसरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आंदोलक शेतकरी गाजियाबाद-दिल्ली सीमेवर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सामान्यांबरोबरच लोकप्रिय व्यक्तींचाही पाठिंबा मिळू लागला आहे. कुस्तीपटूंकडून देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे.
केंद्र सरकारनं या आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. पण शेतकऱ्यांकडून त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली आहे. ते आज देव दीपावली निमित्त वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
‘एखाद्या क्षेत्रात आधुनिकतेवर भर दिला जातो, तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. गेल्या काही वर्षात तसा प्रयत्न झाला आहे. गावखेड्यांमध्ये चांगल्या रस्त्यांसोबतच धान्य साठवणुकीची व्यवस्था, कोल्ड स्टोरेज उभारले गेले पाहिजेत. यासाठी 1 लाख कोटी रुपयाच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच किसान रेल्वे सुरु करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत. मोठ्या शहरांपर्यंत त्यांना पोहोचता येत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात सकारात्मक वाढ होताना दिसत आहे,’ असं मोदी यांनी स्पष्ट केलं.
कृषी कायद्यांतील बदलांचा निर्णय तर योग्य आहे, पण त्यामुळे पुढे जाऊन परिणाम भोगावे लागतील, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण केली जात असल्याचा आरोप मोदी यांनी विरोधकांवर केला. जे आतापर्यंत झालं नाही. जे कधी होणार नाही, त्यावरुन समाजात संभ्रम निर्माण केला जात असल्याचं मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं ही राज ठाकरेंची आधीपासूनची भूमिका – शर्मिला ठाकरे
- सावरपाडा एक्सप्रेस, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतची नोकरीसाठी राज्यपालांकडे धाव…
- धावत्या कारमध्ये थरार; मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस आमदारावर प्राणघातक हल्ला !
- ऑनलाइन खरेदीवर मिळणाऱ्या ‘कॅश बॅक’विरोधी अ. भा. व्यापारी महासंघाची तक्रार…
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

