मुंबई: श्रीरामांना जननी व जन्मभूमी प्रिय होती. अयोध्येची 500 वर्षांची लढाई त्या जन्मभूमीसाठीच होती. ती आता संपली. भव्य मंदिर उभे राहत आहे. बाजूला श्री हनुमानजी आहेतच, पण देशातले वातावरण हिंदू-मुसलमानांत विभागले. श्रीरामांना ते मान्य झाले असते काय? हनुमानाची गदा देशफोड्यांच्या डोक्यावर बसेल काय? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोकमधून केला आहे.
‘जननी आणि जन्मभूमी स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे असे सांगणाऱ्या राजा श्रीरामांच्या अयोध्येत तीन दिवस होतो. गेल्या 30 वर्षांत मी अनेकदा अयोध्येत गेलो, पण आता अयोध्येचे स्वरूप पूर्ण बदलताना दिसत आहे. लखनौ ते अयोध्या आणि वाराणसी ते अयोध्या असे उत्तम रस्ते आता झाले. अयोध्येच्या विकासासाठी साडेपाच हजार कोटींचा निधी खर्च होत आहे. अयोध्येच्या व आसपासच्या जमिनींना ‘चंद्र आणि मंगळा’वरील जमिनीचा भाव आला आहे. जो राजा श्रीराम पित्यास दिलेल्या वचनास जागून, राज्याचा त्याग करून सरळ वनवासात गेला तो राजा देशभरातील गरीबांचा देव. पंढरपूरचा विठोबा तसा अयोध्येचा राम. त्या अयोध्येत आता राममंदिराच्या रूपाने स्वर्गाची निर्मिती आहे. अयोध्येत गेल्या वर्षापासून वाद सुरू सर्वोच्च न्यायालयाने पानांचे निकालपत्र दिले. रामजन्मभूमीवर अधिकार असल्याचे मान्य केले. एक विश्वस्त मंडळ बनवून मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झाले. एका भव्य हा असा चांगला शेवट झाला. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
श्री राम हे लोकाभिमुख व लोकाभिराम होते. राम हे असे सुंदर व लोभस व्यक्तिमत्त्व होते की, त्यांच्या दर्शनाने शत्रू शस्त्र उचलायचे विसरून जाईल. राम निस्वार्थी होते, त्यागी होते, एकवचनी होते. राम सगळय़ांचेच होते. ते जननायक होते, स्वाभिमानाचे प्रतीक होते. अयोध्येत भव्य मंदिर उभे राहील, पण लोकाभिराम श्रीरामाचे हे गुण कसे घेणार? हिंदू-मुसलमानांच्या झगडय़ात देश जळतो आहे. एका मुसलमान भक्ताने अयोध्येत हनुमानाचे मंदिर उभे केले. तो रामभक्त हनुमानही ही पेटवापेटवी पाहून अस्वस्थ असेल. त्याने रावणाची लंका पेटवली. इथे श्रीरामाचे राज्यच काही जण पेटवायला निघाले. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “तरुणांचे भविष्य उद्धवस्त करणारी…”, बाळासाहेब थोरात यांचा केंद्रावर निशाणा
- Agnipath Scheme: “महाराष्ट्रात एस.टी. आंदोलन चिघळवणारे आता…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा
- केवळ लैंगिक सुखासाठी वेश्यालयात जाणे गुन्हा नाही; कोलकाता हायकोर्टाचा निकाल
- 56 वर्षाचा झंझावात! शिवसेनेच्या वर्धापनदिनी संजय राऊतांचे ट्वीट
- Agnipath Scheme: “शक्तिशाली भारत कधीही नको असलेल्या…”, पी. चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य

