Share

Mulayam Singh Yadav | मुलायम सिंग यादवांना निरोप देताना धर्मेंद्र यादवांचे हुंदके, पाहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मुलायम सिंग यादव (Mulayam Singh Yadav) यांनी १० ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून यादव रुग्णालयात उपचार घेत होते. यादव गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलच्या (Mudanta Hospital) आयसीयूमध्ये होते. अशातच मुलायम सिंग यादव यांचे जुने सहकारी धर्मेंद्र यादव पार्थिवाजवळ ढसाढसा रडताना दिसले. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवाच्या जवळ उभे असताना ढसाढसा रडायला लागले. त्यांचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुलायम सिंह यांचे पार्थिव सैफईमध्ये ठेवण्यात आले त्याआधी मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यांच्यावर उपचार होत असतानाही धर्मेंद्र यादव बरेचदा तेथे दिसले होते. पण आज मुलायम सिंहांना शेवटचा निरोप देत असताना धर्मेंद्र यादवांचा हुंदका फुटला.

पाहा व्हिडीओ –

22 नोव्हेंबर 1939 रोजी यांचा जन्म झाला होता. मुलायम सिंग यांनी राम मनोहर लोहिया (Ram Manohar Lohia), राज नारायण (Raj Narayan) यांसारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण सुरु केलं होतं. 1967 मध्ये यादव विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 1989 मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. 1992 मध्ये यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर 1993 मध्ये ते दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. तसेच 2003 साली यादव तिसऱ्यांदा आणि शेवटच्या वेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाले.

2012 साली यादव प्रचंड चर्चेत आले होते. 2012 च्या प्रसिद्ध बलात्काराच्या घटनेनंतर भारतात बलात्काराबाबत कडक कायदा करण्यात आला होता. याला विरोध करत मुलंच चुका करतात, ती मुलं असतात, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला जगभरातून विरोध करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!