🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जिव्हारी लागेल अशी टिप्पणी केली होती. “शिवसेनेला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्या सर्वांना संपवत शिवसेना पुढे जात राहिली,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला होता. या टीकेला आता सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विचार योग्य असेल तर कुणी कुणाला संपवू शकत नाही. पण जनता मात्र एखाद्या पक्षाला संपवू शकते. शिवसेना संपली तर त्याला कुणी नेता जवाबदार असणार नाही. मात्र जर जनतेनेच मत दिली नाही, तर शिवसेना संपेल. आता जनतेलाच जर संपविण्याचा संकल्प असेल तर मग हे आच्छर्य जनक आहे. जनतेच्या विरोधात कोणता पक्ष वागू शकत नाही, हे मात्र निश्चित.
राणा दाम्पत्यांवर बोलतांना मुनगंटीवार म्हणाले, खासदार नवनित राणा या जनतेतून निवडून आल्यात. त्यांचे पती रवी राणा तीनदा अपक्ष निवडून आलेत.हनूमान चालीसा पठण करणार या कारणानी राणा दाम्पत्यांना चौदा दिवस जेल मध्ये टाकण्यात आलं. सरकारची ही कृती निर्दयी आहे. आम्ही जनतेतून निवडून आलोत.तुम्ही मागील दारातून मुख्यमंत्री झालात. तुम्ही जनतेचे खरे प्रतिनिधी नाहीत. ही त्यामागची भावना आहे. तुम्ही ज्या पध्दतीने सूड घेतला. त्या सूडा संदर्भात जनता आपला निर्णय नक्की शिवसेनेचा विरोधात देईल.
किशोरी पेडणेकरांची नवनीत राणावर टीका –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा, असेही राणा म्हणाल्या. दरम्यान, नवनीत राणा यांच्या या आव्हानांवर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नवनीत राणा जे बोलल्या ते हल्लाबोल नसून त्यांच्यातली खाज आहे. आपले मुख्यमंत्री हल्लाबोल करण्यासारखे नाहीत. उद्धव ठाकरे हे त्यांच्या चांगल्या कामामुळे केवळ राज्यातच नाही तर देशातही अव्वल आले, ती खरी दोघांचीही पोटदुखी आहे, एकाचा भोंगा आहे तर दुसऱ्याचा सोंगा आहे आणि अॅम्प्लिफायर तर वेगळाच आहे’, असे पेडणेकर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
