Share

“मुख्यमंत्र्यांसाठी अच्छे दिन, जनतेसाठी मात्र बुरे दिन,” ; रावसाहेब दानवेंची टीका

Published On: 

जालना : मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपने ओबीसी आरक्षणाचा खून केल्याची टीका केली होती. यावर आता रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिलंय. राज्य सरकार २ वर्षात इम्पेरीकल डाटा देऊ शकलं नाही, ते सात महिन्यात कसं देणार ? अशी टीका रावसाहेब दानवे यांनी छगन भुजबळ यांच्यासह राज्य सरकारवर केली आहे. राज्य सरकारमधील सर्व ओबीसी मंत्री हे शोभेच्या वस्तू असून ओबीसींवर अन्याय करणं हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलं आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने महिला बचत गटाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सॅनेटरी पॅडसच्या युनीटचं उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालन्यातील राजूर या ठिकाणी झालं.यावेळी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.

भाजपला धोका देऊन मुख्यमंत्र्यांना अच्छे दिन आले असून राज्यातील १२ कोटी जनतेला या मंत्र्यांनी बुरे दिन आले आहे. दानवे म्हणाले.जो मुख्यमंत्री मंत्रालयात २ वर्ष जात नाही.त्यांच्यासाठी हे अच्छे दिन असून जनतेसाठी बुरे दिन आहे. राज ठाकरे यांना आम्ही पुढे आणलं नसून ते फक्त भाजपच्या बाजूने बोलले आहेत. याशिवाय भाजपचं कर्तृत्व पाहून राज ठाकरे आमच्या बाजूने बोलले आहेत. राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्याच फोनवरून झालेली भेट होती. त्यांनी अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे गाड्या मागितल्या होत्या. त्यासाठी ही भेट झाली. या भेटीत कोणतीही राजकिय चर्चा झाली नाही असंही दानवे म्हणाले.

जालन्यातील त्या कार्यक्रमात माझ्या आधीच्या वक्त्याने जालना पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त वार्डात ब्राह्मणांना तिकिटं द्या अशी मागणी केली होती.म्हणून आपण ते वक्तव्य केल्याच दानवे म्हणाले.देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असते, पण दगाफटका झाला. येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना जागा दाखवतील, असा ईशारा देखील दानवे यांनी शिवसेनेला दिला.

एका मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेचे सर्व आमदार खासदार नाराज असून हे काय आमचे कोथळे काढतील ? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू, असा इशारा संजय राऊत यांना दानवे यांनी दिला.मुख्यमंत्र्यांविरोधात राज्यातील कोणत्याही मतदार संघातून लढायला तयार असल्याचं आव्हान नवनीत राणा यांनी दिलंय, यावर नवनीत राणा उत्तर देतील असं दानवे यांनी सांगितलं आहे. याशिवाय आम्ही आता कोणताही पक्ष फोडफाडीच्या नादील लागलेलो नसून २०२४ च्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर सत्ता आणणार, असेही दानवे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!