Share

“राज ठाकरेंना इशारा देणाऱ्या भाजप खासदाराच्या भूमिकेला माझा पाठिंबा” – रामदास आठवले

Published On: 

मुंबई : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली होती. त्यांनतर त्यांनी फेसबुक पोस्ट करत कडाडून विरोधही केला. राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ५ जूनला चलो अयोध्या महाअभियान आयोजित करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या भूमिकेला रामदास आठवले यांनी पाठींबा दिला आहे.

भाजप खासदार यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सांगली येथे पत्रकार बैठकीत ते बोलत होते. राज्यसरकारमध्ये काँग्रेस पक्षाला डावलल जातंय, काँग्रेसने अपमान सहन करत तेथे राहण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावे. पर्यायी सरकार स्थापन करण्याची आमची तयारी आहे,  असेही रामदास आठवले म्हणाले.

ब्रिजभूषण शरण सिंह यांची भूमिका –

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. यावरून आता राजकारण तापलं आहे. पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला आहे. “राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही” असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!