मुंबई: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातच नव्हे तर देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
रावसाहेब दानवे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. ‘कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी.’ असे ट्वीट रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी.
धन्यवाद.— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) January 7, 2022
दरम्यान कालच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत ७० हून अधिक राजकीय नेत्यांना कोरोनाने गाठले आहे. त्यातच देशात सात महिन्यानंतर पहिल्यांदाच एक लाखाहून जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याआधी ६ जूनला एक लाख रुग्ण आढळले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- सारा तेंडुलकर आणि शुभमन गील रिलेशनशिपमध्ये?; ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण
- ‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’; नाना पटोलेंचा हल्लाबोल
- दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी


