🕒 1 min read
नवी दिल्ली: एकीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. हळूहळू संपूर्ण जगभरात निर्बंध शिथिल केले जात आहेत. जग पुन्हा रुळावर येत आहे. मात्र अजूनही कोरोना पूर्णपणे नाहीसा झालेला नाहीये. आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. (Former US President Barack Obama Kovid Positive) याबबत त्यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
My best wishes @BarackObama for your quick recovery from COVID-19, and for your family's good health and wellbeing. https://t.co/mCrUvXlsAp
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2022
“बराक ओबामा तुम्हाला COVID-19 मधून लवकर बरे होण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी माझ्या शुभेच्छा”, असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दरम्यान ओबामा यांनीही ट्वीट करत म्हटले आहे की, “माझी नुकतीच COVID चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझा काही दिवसांपासून घसा खवखवत आहे, पण मला बरे वाटत आहे. मिशेल आणि मी लसीकरण केल्याबद्दल कृतज्ञ आहोत आणि तिला प्रोत्साहन दिले आहे तसेच तिची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली आहे.”
महत्वाच्या बातम्या:
-
योगी आणि महाराजांची जागा मठात असून राजकारणात नाही; आमदार प्रणिती शिंदेंचे वक्तव्य
-
IND vs SL: ऋषभ पंतने रचला नवीन इतिहास; कपिल देव आणि धोनीला मागे सोडले!
-
फडणवीसांनी ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती- प्रकाश आंबेडकर
-
IND vs SL: पंत-अय्यरने दुसऱ्या दिवशी रचला इतिहास; सामन्यात घडले ‘हे’ मोठे विक्रम!
-
योगी आदित्यनाथांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
