🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President Sharad Pawar Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवारांनी स्वतः ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आणि चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान यावरच राष्ट्रवादीचे नेते तथा शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या ट्वीटने सर्वांनाच काळजी वाटू लागलीये. पण मला माहितीये….योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल, संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!” असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय.
पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो!तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!#getwellsoon@PawarSpeaks
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 24, 2022
“माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की, त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे ट्वीट शरद पवारांनी केले आहे. दरम्यान राज्यात काल दिवसभरात करोनाचे ४०,८०५ नवीन रुग्ण आढळले. तर २७,३७७ रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आत्तापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे २,४७५९ रुग्ण आढळून आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- गावगुंड नाना पटोले यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावे त्यांचे कपडे फाडू; भाजपकडून पटोलेंविरोधात आंदोलन!
- सहकारी साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र
- “राम मंदिराच्या लढ्यात सगळ्या केसेस शिवसैनिकांनी अंगावर घेतल्या”, भाजपच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर
- शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह; पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करत म्हणाले….
- कॉमेडीयन भारती सिंहने घेतले सलमानकडून आश्वासन म्हणाली, “आमच्या बाळाला लाँच कराल का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
