Share

SL vs AUS : चाललंय काय? कसोटी सामन्यादरम्यान लंकेचा अजून एक खेळाडू आढळला कोरोना पॉझिटिव्ह!

Published On: 

SL vs AUS । मुंबई : गॉल येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (SL vs AUS) मध्यावर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा धक्का बसला आहे. टीमचा सलामीवीर पाथुम निसांका कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यानंतर, त्याला लगेचच दुसऱ्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून तो उर्वरित कसोटीत खेळणार नाही. त्याच्या जागी ओशादा फर्नांडोचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेच्या पहिल्या डावात केवळ ६ धावा करून निसांका बाद झाला. कॅमेरून ग्रीनने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याचा शानदार झेल घेतला.

श्रीलंका क्रिकेटने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “पाथुम निसांकाने एका दिवसापूर्वी तब्येतीची तक्रार केली होती. यानंतर, कोरोना संसर्ग तपासण्यासाठी त्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर सायंकाळी आरटी पीसीआर चाचणीही करण्यात आली. त्यातही त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. यानंतर त्याला तातडीने दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले. आता त्यांना कोरोना प्रोटोकॉल पाळावा लागेल.”

दोन सामन्यांमध्ये ही दुसरी वेळ आहे, जेव्हा ओशादा फर्नांडो कोविड सबस्टिट्यूट म्हणून संघाशी जोडला गेला आहे. यापूर्वी त्याने अँजेलो मॅथ्यूजची जागा घेतली होती. मॅथ्यूज हा कोरोनाची लागण झालेला पहिला श्रीलंकेचा खेळाडू होता. त्यानंतर प्रवीण जयविक्रमा, धनंजय डी सिल्वा, असिथ फर्नांडो, जेफ्री वँडर्स यांनाही व्हायरसमुळे दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. मॅथ्यूज पाच दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर गॉल येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेच्या संघाचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया मालिका सुरू झाल्यानंतर, निसांका कोरोना संक्रमित झालेला श्रीलंकेचा सहावा खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!