🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President Sharad Pawar Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवारांनी स्वतः ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आणि चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
“माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की, त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे ट्वीट शरद पवारांनी केले आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
दरम्यान राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठल्याचे दिसून आले. यामध्ये पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील अशा अनेक नेत्यांचा समावेश होता. यापैकी बरेचजण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान राज्यात काल दिवसभरात करोनाचे ४०,८०५ नवीन रुग्ण आढळले. तर २७,३७७ रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आत्तापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे २,४७५९ रुग्ण आढळून आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात”, फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- सिल्लोड येथील बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक शिवसैनिकांना प्रेरणा देणारे शक्तीस्थळ ठरेल-अब्दुल सत्तार
- मेकअप सुरू असताना अभिनेत्री सारा अली खानसोबत घडली अशी भयावह घटना
- “इंदिरा गांधी पंतप्रधान असताना…”; बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे उदाहरण देत भुजबळांनी टोचले पटोलेंचे कान
- “राज्य अंधारात गेलं तर फक्त काँग्रेसच नाही त्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी जबाबदार”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
