मुंबई: दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यात कोरोना रुग्णसंख्येतही दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. जर कोरोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊनबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अशातच आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनाही कोरोनाने गाठले आहे. ‘आज माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आणि मी स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती आहे की त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.’ असे ट्वीट करत भारती पवार यांनी कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.
आज मेरी #Covid_19 टेस्ट का रिपोर्ट POSITIVE आया है और मैने अपने आप को घर में क्वॉरंटाइन कर लिया है.
मेरे संपर्क में आये व्यक्तियों से निवेदन है कि वो अपना #Covid-19 टेस्ट करवाएं और कोरोना के बचाव के नियमों का पालन करें.— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) January 6, 2022
दरम्यान मंत्रीमंडळातील तब्बल ७० आमदार आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड,आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर,राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते अतुल भातखळकर, राम सातपुते यांनाही कोरोनाने गाठले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘त्या’ घटनेवरून अमरिंदर सिंग यांनी केली पंजाब मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
- ‘विषाचे कडू घोट प्राशन करून सिंधुताईंनी अनाथांच्या आयुष्यात हसू फुलवलं’
- भाजप नेते राम सातपुते कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- ‘पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’, भातखळकरांची मागणी
- “पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी नव्हती, दौरा रद्द करण्यास सांगितले होते”; चरणजीत सिंह चन्नींची प्रतिक्रिया


