🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण चांगलेच रंगले आहे. यावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील टीका केली आहे. टिळक भवन येथे बोलताना नाना पटोले म्हणाले, हा ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला, त्यामागे काय हेतू होता? असा प्रश्न उपस्थित यावेळी नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. त्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी सविस्तर प्रकाश टाकलेला आहेच, परंतु भाजपाकडून जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देत काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले जात असल्याची टीका पटोले यांनी केली आहे. पंतप्रधानांची सुरक्षा ही एसपीजीकडे असते तसेच अनेक महत्वाच्या केंद्रीय यंत्रणा त्यात सहभागी असतात म्हणून भाजपाने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोरच आंदोलन करून त्यांना जाब विचारावा, असंही नाना पटोले म्हणाले.
पंजाबातील घटनेनंतर भाजप नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानाचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान व त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे. हे पाहता शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने हे सर्व ठरवून केल्याचे स्पष्ट दिसत असून नरेंद्र मोदी व भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी
- पाच राज्यांच्या निवडणुका लवकरच; येत्या दोन दिवसात तारखा होणार जाहीर
- प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला, म्हणाले…
- सुटलेल्या पोटामुळे सलमान झाला ट्रोल ; नेटकरी म्हणाले…
- अमृता फडणवीसांची विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस; म्हणाल्या,‘आता कोर्टात जाऊन साफ करावी…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
