🕒 1 min read
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा द राइज’ (Pushpa) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रंचड प्रतिसाद ही मिळत आहे. बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अल्लू अर्जुनच्या अभिनयाची प्रशंसा केली. मात्र दुबईहून परतल्यानंतर सुपरस्टार महेश बाबूने (Mahesh Babu) अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचे कौतुकपर शेअर केलेल्या ट्वीटमुळे त्याला ट्रोल केले जात आहे.
दरम्यान महेश बाबूने ‘पुष्पा’ हा चित्रपट पाहिला आणि ट्विटरवर ट्वीट (Tweet) करत अल्लू अर्जुनची प्रशंसा केली आहे. ‘अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट खूप छान आहे. एक उत्कृष्ट कथा आहे. सुकुमारने पुन्हा सिद्ध केले की त्याच्या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाजवळ असते. एक वेगळाच चित्रपट’ या आशयाचे ट्वीट महेश बाबूने केले आहे. चाहत्यांनी लाईक कमेंट केले आहे.
.@alluarjun as Pushpa is stunning, original and sensational… a stellar act ???????????? @aryasukku proves again that his cinema is raw, rustic and brutally honest… a class apart ????????
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) January 4, 2022
तसेच आणखी एक ट्वीट करत महेश बाबूने संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. मात्र महेश बाबूने ट्वीटमध्ये रश्मिकाचा उल्लेख न केल्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. काही नेटकऱ्यांनी रश्मिकाचे नाव न घेतल्यामुळे महेश बाबूला चांगलेच सुनावले असून नाराजी (fan disappointed) व्यक्त केली आहे. . ‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटीहून अधिक रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे. मात्र नुकतच महेश बाबूच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेला उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला, म्हणाले…
- सुटलेल्या पोटामुळे सलमान झाला ट्रोल ; नेटकरी म्हणाले…
- अमृता फडणवीसांची विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस; म्हणाल्या,‘आता कोर्टात जाऊन साफ करावी…’
- ज्या देशात देवी म्हणून महिलांची पूजा केली जाते त्याच देशात मुस्लिम महिलांना…
- खुशखबर; मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता औरंगाबादेतही धावणार मेट्रो..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
