Share

“सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज किती चढावा याचे आदर्श…”; अतुल भातखळकरांचा ‘प्रहार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. हनुमान चालीसा पठणाचा विषय अजूनही गरम असताना पाहायला मिळत आहे. यावरून विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच आता बच्चू कडू यांनी यात उडी घेतली आहे. तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. आता प्रत्युत्तर देत अतुल भातखळकरांनी जोरदार प्रहार केला आहे.

“शिवसेनेची दादागिरी ही प्रामाणिकपणाची आहे. ‘मातोश्री’ हे शिवसेनेचं श्रद्धास्थान आहे. त्याला ललकारण्याचा प्रयत्न शिवसैनिक कसे सहन करणार? दुसऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या राणा दाम्पत्याला लाज वाटायला हवी. जेलमध्ये राणा दाम्पत्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानायला हवेत. आता राणा दाम्पत्याला तक्रार करण्यासाठी दिल्ली हेच एकमेव ठिकाण उरलं आहे. त्यांनी सरकारी कार्यालयात तक्रार केली तरी त्याची दखल भाजपच्या कार्यालयातून घेतली जाते,” असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

आता याला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “नवनीत राणांनी तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून सरकारचे आभार मानावेत असे बच्चू कडू म्हणाले. पण सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज किती चढावा याचे आदर्श उदाहरण महाविकास आघाडी सरकार आहे. जनता मतपेटीद्वारे या किडुकमिडुक माजोरड्यांना आपटायला उत्सुकतेने वाट बघते आहे”, असा प्रहार केला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!