कोईमतूर: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि ते दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना जागरूक ठेवतात. तसेच आनंद महिंद्रा किती दान शील व्यक्ती आहे, हे त्यांच्या ट्विटर हँडलवर पाहून कळतेच. मदर्स डे निमित्त आनंद महिंद्रा यांनी तामिळनाडूतील कोईमतूर येथे राहणाऱ्या ‘इडली अम्मा’ ला घर भेट दिले आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी स्वत: ट्विटरवर इडली अम्माला नवीन घर दिल्याची माहिती दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांना दिलेले वचन आता मदर्स डेच्या दिवशी पूर्ण झाले आहे. व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, “मदर्स डे निम्मित इडली अम्माला भेट देण्यासाठी वेळेत घराचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल आमच्या टीमचे अपार कृतज्ञता ती आईच्या सद्गुणांचे मूर्त रूप: पालनपोषण, काळजी आणि निस्वार्थी आहे. तिला आणि तिच्या कामाला पाठिंबा देण्यास सक्षम असण्याचा विशेषाधिकार. तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा”!
Immense gratitude to our team for completing the construction of the house in time to gift it to Idli Amma on #MothersDay She’s the embodiment of a Mother’s virtues: nurturing, caring & selfless. A privilege to be able to support her & her work. Happy Mother’s Day to you all! pic.twitter.com/LgfR2UIfnm
— anand mahindra (@anandmahindra) May 8, 2022
त्यांना आणि त्यांच्या कार्याला पाठिंबा देण्याचे भाग्य लाभले. त्यांनी ‘मदर्स डे’ च्या शुभेच्छा आपल्या ट्विटमध्ये दिल्या आहेत. ज्या लोकांना ‘इडली अम्मा’ हे नाव माहित आहे, ती तामिळनाडूच्या कोईमतूर जिल्ह्यात राहणारी एम. कमलाथाल आहे. ती ८५ वर्षांची आहे आणि तिच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना एक रुपयात इडली खायला घालते, जेणेकरून कोणीही कामगार उपाशी राहू नये. गेल्या तीन वर्षांपासून ती हे काम करत आहे.
महत्वाच्या बातम्या –


