Share

IPL 2022 LSG vs GT : फक्त एका षटकारासह गुजरातची शांत फलंदाजी..! लखनऊला १४५ धावांचं आव्हान

Published On: 

पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (LSG vs GT) यांच्यात स्पर्धेचा ५७वा सामना खेळवला जात आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातने लखनऊला १४५ धावांचे आव्हान दिले आहे. गुजरातकडून संयमी ६३ धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. साई किशोरने गुजरातकडून तर करण शर्माने लखनऊकडून पदार्पणाचा पदार्पण केले आहे.

गुजरातचा डाव

शुबमन गिलसोबत सलामीला आलेल्या वृद्धिमान साहाला गुजरातसाठी चांगली सुरुवात करता आली नाही. वेगवान गोलंदाज मोहसीन खानने साहाला (५) फसवले. त्यानंतर आवेश खानने मॅथ्यू वेड (१०) आणि कप्तान हार्दिक पंड्याला (११) तंबूचा मार्ग दाखवला डेव्हि़ड मिलरने संथ २६ धावा केल्या. शुबमनने अर्धशतक साजरे केले, पण तोही मोठी फटकेबाजी करू शकला नाही. राहुल तेवतियाने नाबाद २२ धावा करत गुजरातला दीडशे धावांच्या जवळ पोहोचवले. गिलने ७ चौकारांसह नाबाद ६३ धावा केल्या. २० षटकात गुजरातने ४ बाद १४४ धावा केल्या. या सामन्यात गुजरातने फलंदाजीदरम्यान फक्त एक षटकार ठोकला. लखनऊकडून आवेश खानने २२ धावांत २ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, करण शर्मा, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, मोहसीन खान.

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रवीश्रीनिवासन साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!