Chandrashekhar Bawankule | नागपूर : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बडे उद्योग प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अंधारात ठेवून वेदांता-फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. याला आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ते खोटं बोलत आहे. वेदांतामध्ये माहिती अधिकारातच समोर आले आहे की मागच्या सरकारने कुठेही वेदांताला जागा दिलेली नाही. त्यासंदर्भात कुठेही बैठक घेतली नाही. त्यामुळे वेदांता परत गेला आहे. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला असल्याचा आरोप बावनकुळेंनी केलाय.
उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग, कंपन्या कोणाशी बोलले असते. त्या काळात कुठलेही शासकीय जीआर काढले नाही. जमीन दिली नाही. आता खोटारडेपणाचा कळस करत आहेत, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
याच प्रकल्पाबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ४ लाख कोटी घेऊन वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प येणार असं म्हटलं होतं. एमआयडीसीच्या जर्नलमध्ये 1 लाख कोटी घेऊन येणार असं आलं होतं. उपमुख्यमंत्र्यांनीदेखील ट्विट केलेलं, बैठका घेतलेलं. हे सगळं झालं असलं तरी जेव्हा आम्ही हा विषय आला तेव्हा हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार काळातच गुजरातला गेला, असा आरोप केला. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १०० टक्के येणार होता. पण फडणवीसांच्या बैठकीनंतर ऐनवेळी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत एमआयडीसीच्या तत्कालीन सीईओंनी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या चेअरमनना लिहिलेलं पत्र सादर केलं.
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal | “शिवरायांचा इतिहास माहीत नसेल तर…”, छगन भुजबळ लोढांवर संतापले
- Nawab Malik | नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; ईडीच्या विशेष न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला
- Chandrasekhar Bawankule | “राज्यपालांची चूक झाली, पण…” ; चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
- Nagnath Kotapalle | ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
- Sanjay Raut | “राज्यपाल अजूनही राजभवनात कसे?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

