🕒 1 min read
Atul Bhatkhalkar | मुंबई : गेल्या दोन महिन्यांत राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला याविषयी दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत. राज्यातील विकास प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना विरोधकांनी हे सगळं सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खुलं आव्हान केलं होतं. त्यांच्या या आव्हानानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासारखे रिकामटेकडे आणि बिनकामाचे वाटले की काय?,” असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
“त्यांना चर्चाच करायची असेल तरी बिनकामाचे रिकामटेकडे माजी मुख्यमंत्री घरी बसून आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करावी,” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर देखील निशाणा साधलाय.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
ते म्हणाले, “वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिव्हाईस असेल किंवा इतर हे सगळे प्रकल्प आपल्या राज्यातून गेलेच कसे यावर चॅलेंज करावं. इतर लोकं नुसता आरोप करतात. मध्यंतरी टाटाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्रात येण्यासारखं वातावरण नाही, असं सांगतिलं. पण त्या उच्च अधिकाऱ्याचं नाव अजून समोर आलेलं नाही. कोण बोललं ते कळलेलं नाही.” मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा एकदा चॅलेंज देतो कारण मला इतरांकडून उत्तर अपेक्षित नाहीय. त्यामुळे मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज देतो की, मीडियासमोर माझ्यासोबत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा करायला या, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं. आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत एमआयडीसीच्या तत्कालीन सीईओंनी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या चेअरमनना लिहिलेलं पत्र सादर केलं. माहिती अधिकारांतर्गत हे पत्र आपण मिळवल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. हे इंग्रजीतील पत्र आदित्य ठाकरेंनी यावेळी पत्रकार परिषदेत वाचून दाखवलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही – संजय राऊत
- IIFA 2023 | अबुधाबीमध्ये पुन्हा एकदा रंगणार आयफा अवॉर्ड सोहळा, ‘हे’ स्टार्स करणार कार्यक्रम होस्ट
- Vikram Kirloskar Death | ‘टोयोटा’ची वेगळी ओळख निर्माण करणारे, विक्रम किर्लोस्कर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन
- Winter Care Tips | सावधान! हिवाळ्यामध्ये स्वेटर घालून झोपत असाल तर होऊ शकतात ‘या’ आरोग्याच्या समस्या
- IND vs NZ | “पंतला आता विश्रांती देण्याची…”; संजू सॅमसनला संघातून वगळल्याने शशी थरूर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
