Share

Atul Bhatkhalkar | “कटुता वाढण्याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आणि…”; अतुल भातखळकरांचे आरोप

Published On: 

🕒 1 min read

Atul Bhatkhalkar |  Mumbai : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. ते अनेक राजकीय भेटीगाठी करणार आहेत. अशातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं कौतुक केलं असून ते दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shaha) यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या संदर्भात भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

भातखळकर म्हणाले, “संजय राऊत कटुता संपवण्याची भूमिका मांडणार असतील, तर चांगली गोष्ट आहे. फक्त त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून,स्वतःच्या पक्षापासून करायला हवी.” खोके, गद्दार, खंजीर, लोकांना घरात जाऊन मारहाण केल्यानंतर शिवसैनिकांचं समर्थन करणं, माजी नौदल अधिकाऱ्यांना केलेली मारहाण हेही थांबवावं, असा सल्ला अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊत यांना दिला.

“कटुता संपवावी ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. कारण आमची ती कायमची भूमिका आहे. अटलबिहारी वाजपेयी कायम म्हणत आलेत आणि आम्हीही म्हणत आलो की, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, तर विरोधक असतो. हल्ले करायचे, घाणेरड्या भाषेत बोलायचं असं सुरू असल्याचं भातखळकर म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, “मागील दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील कटुता वाढली. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना, त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, जितेंद्र आव्हाड अशी मंडळी आहे,” असा आरोप भातखळकरांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!