🕒 1 min read
Atul Bhatkhalkar । मुंबई : हर हर महादेव चित्रपट बंड पाडण्यावरुन जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, जामीनानंतर राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आव्हाड यांच्यावर एका महिलेने गैरवर्तनाचा आरोप केला आहे. यासंदर्भात भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट केलं आहे.
ते म्हणाले, एका महीलेच्या दंडाला हात लावून ढकलण्यात आले हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय. तरीही कांगावा लोकशाही बुडाल्याचा होतोय असं म्हणत त्यांनी एक सवालही उपस्थित केला आहे. अशाप्रकारे गैरवर्तन झाल्यानंतर ती महीला गप्प बसली असती तर लोकशाहीची मान उंचावली असती का? असा सवाल करत त्यांनी आव्हाडांना टोला लगावला आहे.
एका महीलेच्या दंडाला हात लावून ढकलण्यात आले हे व्हीडीयोमध्ये स्पष्ट दिसतेय. तरीही कांगावा लोकशाही बुडाल्याचा होतोय.
अशाप्रकारे गैरवर्तन झाल्यानंतर ती महीला गप्प बसली असती तर लोकशाहीची मान उंचावली असती का?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 14, 2022
काय आहे प्रकरण?
जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड एका महिलेला ढकलताना दिसत आहेत. कळव्यामध्ये पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमातला हा व्हिडिओ आहे. याबाबात सांगताना, काही वेळ मी बाजूला होते, कारण खूप गर्दी होती. साहेबांची निघण्याची वेळ होती, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना माझी अडचण आली, का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. ढकललं मला. आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते, असं संबंधित महिलेने म्हटलं आहे. मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये”, जयंत पाटलांची विनवणी
- Jitendra Awhad | “खोटा आरोप, खोटा गुन्हा”, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच कार्यकर्ते आक्रमक
- Sanjay Raut | “आमच्या शिवरायांना विकू नका!”, सामनातून राऊतांचा हल्लाबोल
- Amol Mitkari | “चळवळीत ‘या’ चार परिक्षा द्यावा लागतात, आव्हाड साहेब…”, अमोल मिटकरींनी केली आव्हाडांची पाठराखन
- Deepak Kesarkar | ठाकरे अन् शिंदे गट येणार एकत्र?, दीपक केसरकर म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
