Share

Sushma Andhare । “बाप चोरणारी टोळी हे वाक्य ‘यांनी’ खरं केलं”; सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर?

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare ।  पुणे : राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असा कलगीतुरा राज्यात रंगला आहे. तर दुसरीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला उद्देशून बाप चोरणारी टोळी असं म्हंटल होतं. अशातच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी याच मुद्द्यावरून प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर यांना टोला लगावला आहे.

त्या म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. असं प्रवीण दरेकर त्यांच्याच मुलाला विचारतात. गटप्रमुखांच्या मेळाव्यात पक्षप्रमुखांनी म्हटलं, मुलं चोरणारी टोळी आतापर्यंत अस्तित्वात होती. पण, बाप चोरणारी टोळी आम्ही पहिल्यांदा बघीतली. हे वाक्य अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांनी खरं उतरवलं असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

पुढे त्या म्हणतात, अब्दुल सत्तार हे महिलांबद्दल प्रचंड अवमानकारक बोलतात. त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याच अधिकार आहे का? गुलाबराव पाटील हे सुद्धा महिलांबद्दल अवमानकारक भाषा वापरतात. त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का, असा सवालही सुषमा अंधारे यांनी केलाय.

दरम्यान, वैचारिक लढाई तसेच ध्येय आणि विषय यावर बोललं गेलं पाहिजे. निवडणुकीचा जाहीरनामा, पक्षाची विचारधारा यावर बोलणं गरजेचं वाटतं. कोणाच्या घरी दाळ शिजते. कोणाच्या घरी कोणती भाजी शिजते, यावर राजकीय भूमिका ठरत नाही, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!