🕒 1 min read
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. या मालिकेतील शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याच्या बातम्या गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहेत. शैलेश लोढा एकाही एपिसोडमध्ये दिसत नाही, ज्यामुळे ही बातमी खरोखरच खरी असल्याचे दिसते. पण यांनी खरोखरच शोचा निरोप घेतला आहे का? हा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण होत आहे.
जेव्हा एपिसोड संपतो तेव्हा शैलेश लोढा अजूनही त्या विशिष्ट एपिसोडबद्दल त्यांची खास टिप्पणी करताना दिसतात. यामुळे अशी अपेक्षा आहे की शैलेश लोढा यांनी अद्याप तारक मेहताची भूमिका सोडलेली नाही आणि ते लवकरच शोमध्ये माघारी येतील.
शैलेश लोढा एका एपिसोडसाठी घेतात इतके पैसे –
शैलेश लोढा हे या मालिकेमधील महत्वाचे कलाकार आहेत. त्यासोबत ते प्रसिद्ध कवी देखील आहेत. यामुळे त्यांना मालिकेमध्ये खूप चांगले पॅकेज दिले जात होते. मालिकेमधील एपिसोड बद्दल पहिले तर, शैलेश लोढा एका एपिसोडसाठी एक लाख रुपये घेत होते. माहितीनुसार, मालिकेमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त मानधन घेणारे ते अभिनेते आहेत. या मालिकेतील जेठालालची भूमिका साकारत असलेलर दिलीप जोशी आणि दयाबेनची भूमिका दिशा वाकाणी या दोन मुख्य कलाकारांनंतर शैलेश लोढा येतात.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
