Share

“…तर ओबीसी आरक्षणाची कत्तल होईल”, छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यात इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. मात्र या कामात काही त्रुटी आढळल्या आहेत. केवळ आडनावावरुन जर घरात बसून माहिती गोळा केली तर ओबीसी आरक्षणाची कत्तल होईल, अशी भीती राज्याचे  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

चुकीच्या पद्धतीने डाटा गोळा केला तर राजकीय आरक्षणच नाही तर त्याचा विपरीत परिणाम नोकरी आणि शिक्षणाच्या आरक्षणावर देखील होईल. या सदंर्भात भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना याप्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे, अशी माहितीही भुजबळ यांनी दिली आहे. 

इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी सॉफ्टवेअर कंपनीला आऊटसोर्सिंगचे काम देण्यात आले आहे. सॉफ्टवेअर कंपनीला जे निर्देश दिलेत, त्याप्रमाणे त्यांचे काम सुरू आहे. केवळ आडनावाचा आधार घेऊन माहिती गोळा केल्यास ते अत्यंत चुकीचे होईल. ओबीसी समाज हा ५४ टक्के आहे हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. त्यातही २००४ पर्यंत ओबीसी समाजात अडीचशे जाती होत्या. आता त्यात सव्वाचारशे जाती आहेत, त्यामुळे ओबीसींची संख्या वाढेल पण कमी होणार नाही. असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

सॉफ्टवेअरने माहिती गोळा करण्याला मर्यादा येऊ शकतात. यापेक्षा स्थानिक पातळीवर मतदारयाद्या घेऊन ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, आशावर्कर यांनी गावात फिरून ओबीसी समाजाची यादी बनवावी, असा पर्याय छगन भुजबळ यांनी सुचवला.  आडनावांवरून डाटा गोळा केल्यास चुकीचे आकडे समोर येतील. हा परिणाम केवळ या आरक्षणापर्यंत नाही तर या पुढील सर्व आरक्षणावर अडचणी निर्माण होतील, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या डाटाचे योग्य परिक्षण झाले पाहीजे, योग्यरीतीने हा डाटा गोळा करावा अशी सर्वांची मागणी असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!