🕒 1 min read
मुंबई : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. आज सईचा ३६ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त चाहते आणि सेलिब्रेटी यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण यामध्ये सर्वांचे लक्ष सईचा बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगने शेअर केलेल्या पोस्टने वेधले आहे.
अनिशने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली. त्याने सईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅजिक! तू जग जिंकावे अशी माझी इच्छा आहे!”. या पोस्टवर सईने ‘लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे.
https://www.instagram.com/p/CfMtHw4jLxH/
सध्या सर्वांचे लक्ष सईच्या कमेंटने वेधले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
