मुंबई : आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देत असतात. मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. या मालिकेतील चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधतीने मालिका सोडल्याचा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा नुकताच नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधतीचा कोणताही सिन नाही. माहितीनुसार, अरुंधतीने तिच्या काही व्यक्तिक कारणांमुळे काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे.
https://www.instagram.com/p/CfPFn7xpMrS/
दरम्यान, मालिकेमध्ये अरुंधती दिसत नसल्याने तिने मालिका सोडली का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. पण तिने ही मालिका सोडली नसून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. या ब्रेकनंतर अरुंधती लगेच शूटिंग सुरू करणार आहे.
महत्वाच्या बातम्या :


