जालनाः जालन्यात आज भाजपतर्फे जालाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप स्तुतीसुमने उधळली. “उत्तम वक्ता, उत्तम संसदपटू असलेला हा शतरंज का बादशहा आहे. त्यानं राज्यसभेच्या निवडणुकीत अशी चौसर खेळी खेळली की कमी मतं असतानाही भाजपचा उमेदवार निवडून आणला. हा शतरंजचा बादशहा यशस्वी ठरल,” असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
जालन्यातील पाणी प्रश्नावर भाजपकडून जलाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जालन्याच्या पाणी वितरण योजनेसाठी निधी मिळाला, मात्र ठाकरे सरकारच्या काळात ही योजना तसूभरही पुढे सरकली नाही, असा आरोप दानवे यांनी केला.
जालन्यात मोर्चात भाषण करताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस हा शतरंज का बादशहा आहे. आपण त्यांना उत्तम संसदपटू म्हणतो. आपल्याकडे मतं कमी होते, त्यांच्याकडे मतं जास्त होते. अशाही परिस्थितीत आपला शतरंज का बादशहा यशस्वी ठरला. भाजपचा उमेदवार विजयी झाला. आपल्या आग्रहासाठी ते येथे आलेत. मुख्यमंत्री असताना ६ वेळेस जालन्यात आले. आधी २०११ मध्ये २ लाख ८५ हजार एवढी जालन्याची लोकसंख्या होती. आता चार लाख लोकसंख्या आहे. ५८ एमएलडी पाणी आमच्या शहराला लागतं.आज १५ एमएलडी पाणी येतंय. पण आया बहिणी रस्त्यावर येणारच. म्हणून आम्ही सरकारला इशारा देतोय. हा मोर्चा केवळ भाजपाचा नाही. चेहरा आमचा आहे. पण आमच्या पाठिशी जालनेकर आहेत. या मोर्चाची दखल सरकारनं घेतली पाहिजे. वरुणराजाही आज आमच्यासोबत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


