Share

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, ‘भूल भुलैया 2’ लवकरच होणार OTT वर प्रदर्शित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी अभिनित ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल १४ कोटी रुपयांची कमाई केली होती. दरम्यान, चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. पण ओटीटीवर कोणत्या तारखेला चित्रपट रिलीज होईल, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. चाहते हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

https://www.instagram.com/p/CextV2XLOOs/

या चित्रपटामध्ये कार्तिक आणि कियारा यांच्यासोबत अनेक सहकलाकारांनी काम केले. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाच्या यशाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या दोघांनीही कार्तिक आर्यनच्या कामाचे कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!