🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. आलियाने चाहत्यांसाठी एक सुखद धक्का दिला आहे. आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘आमचं बाळ…लवकरचं येत आहे’. यावर आता नीतू कपूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ पापाराझींकडून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये नीतू कपूरला पापाराझी शुभेच्छा देताना दिसत आहेत. ‘दादी बनने वाली हो’ असे एकाने म्हणताच त्यांनी धन्यवाद म्हणत आभार व्यक्त केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
https://www.instagram.com/p/CfTFNeRl400/
रणबीर कपूरची बहीण रिधिमा कपूर, आलियाची आई त्याचबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ, वाणी कपूर, रकुल प्रीत सिंग, मौनी रॉय यांसारख्या कलाकारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्टने 14 एप्रिल रोजी लग्न केले होते. यांचे लग्न मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या ‘वास्तू’ बंगल्यावर झाले होते. रणबीर-आलियाने साधेपणानं केलेल्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
