मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये गुजरातचा संघ त्यांच्या पहिल्याच हंगामात चॅम्पियन बनला. गुजरात संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने संघाच्या विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. सुरुवातीला या संघाला जेतेपदाचा दावेदार म्हणून कोणीही मानले नाही. पण जसजसा हंगाम पुढे सरकत गेला तसतसा हा संघ खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे एकामागून एक सामने जिंकत गेला.
गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गुजरातच्या यशाबद्दल सांगितले आहे. प्रत्येक सामन्यांमध्ये वेगवेगळे खेळाडूंना दमदार खेळ करता आल्याने संघानेही आयपीएल विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले. शमी, लॉकी फर्ग्युसन, शुभमन गिल, कर्णधार हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, रशीद खान, राहुल तेवतिया आणि वृद्धिमान साहा या खेळाडूंनी संघासाठी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. शमी म्हणाला की, ‘जेव्हा आम्ही बाकीच्या संघांच्या तुलनेत आमच्या संघाकडे पाहतो तेव्हा प्रत्येक सामन्यात एक नवा चेहरा सामना विजेता म्हणून उदयास आला ज्याचा निकाल तुम्ही आता पहात आहात.”
Season ek, match winners anek ????
Aao sune aur kya keh rahe hai apne champion bowler ????@MdShami11#SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/LgiPwU80PG
— Gujarat Titans (@gujarat_titans) June 2, 2022
मोहम्मद शमीच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल सांगायचे तर, त्याने यंदाच्या हंगामात १६ सामन्यांमध्ये ८ च्या इकॉनॉमी रेटने २० बळी मिळवले आहेत. त्यापैकी त्याने पॉवर-प्लेमध्ये ६.६२ च्या इकॉनॉमी रेटने ११ गडी बाद केले. गुजरातसाठी शमीने गोलंदाजीत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
शमीने संघातील वातावरणाला दिले विजयाचे श्रेय
पदार्पणाच्या मोसमातच जेतेपद पटकावणाऱ्या गुजरात संघाबाबत शमी म्हणाला की, “मैदानाबाहेरचे खेळाडूंमधील वातावरण संघासाठी खूप उपयुक्त ठरले आहे. एक संघ म्हणून आमच्यात असलेले संबंध खरोखरच चांगले होते. संघ व्यवस्थापनाने त्यांची भूमिका चौक बजावली आहे आणि कोणीही कोणत्याही खेळाडूवर दबाव आणू दिला नाही.”
आता मोहम्मद शमी १ जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात संघासाठी गोलंदाजी करताना दिसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कसोटी सामना गतवर्षी पुढे ढकलण्यात आला होता, जो आता इंग्लंडमधील एजबॅस्टन येथे १ जुलै ते ५ जुलै दरम्यान खेळवला जाईल.
महत्वाच्य बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

