🕒 1 min read
मुंबई : राजस्थान रॉयल्सचे १४ वर्षांनंतर आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात म्हणजे २००८ मध्ये राजस्थानने जी आश्चर्यकारक कामगिरी केली होती. तीच कामगिरी गुजरातच्या संघाने यंदाच्या हंगामात करून दाखवली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ आयपीएलच्या पदार्पणातच चॅम्पियन बनला होता. मात्र यंदाच्या हंगामात राजस्थानला तसे करता आले नाही. स्पर्धा संपल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये खेळाडू एकमेकांचा निरोप घेताना दिसत आहेत.
राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संघाचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल देखील दिसत आहे. तो म्हणाला, “यंदाचा हंगाम खूप राहिला आहे. आम्ही विजेतेपद जिंकून हंगामाचा शेवट केला असता तर आणखी आनंद झाला असता. मात्र आम्हाला अंतिम सामन्याच्या दिवशी चांगला खेळ खेळता आला नाही. पुढील हंगामात यंदाच्या संपूर्ण कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू. त्याच वेळी, व्हिडीओमध्ये प्रसिद्ध कृष्णाही विजेतेपद न जिंकल्यामुळे निराश दिसत होता. पण, त्याने पुढील हंगामात पुनरागमनाची आशाही व्यक्त केली.
Goodbyes are always difficult when it’s family. ????????#RoyalsFamily | #TATAIPL2022 pic.twitter.com/CONVzBxYCs
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 2, 2022
आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सने चांगली कामगिरी केली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने साखळी सामन्यात १४ पैकी ९ सामने जिंकले आणि गुणतालिकेत गुजरात टायटन्सनंतर दुसरे स्थान पटकावले होते. यानंतर राजस्थानला क्वालिफायर-१ मध्ये गुजरातविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र पॉइंट टेबलमध्ये टॉप-२ मध्ये असल्याने राजस्थानला अंतिम सामन्यात पोहोचण्याची आणखी एक संधी मिळाली आणि संघाने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबीचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. विजेतेपदाच्या लढतीत राजस्थान रॉयल्सची फलंदाजी कोलमडली आणि संघाला केवळ १३० धावा करता आल्या. गुजरातने हे लक्ष्य ११ चेंडूत ७ गडी राखून पूर्ण केले.
राजस्थानचा संघ आयपीएल २०२२ चे विजेतेपद जिंकू शकला नाही. पण संघातील जोस बटलर आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंनी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकण्यात यश मिळवले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
