Share

केकेच्या निधनानंतर मुलगी तमारा भावूक ; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Published On: 

मुंबई :  तीन दशकांहून अधिक काळ भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात गायक केके यांचे वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी निधन झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमात परफॉर्म करताना, केके यांना अचानक अस्वस्थ वाटत होते. यानंतर ते आपल्या हॉटेलकडे पुन्हा गेले असता, तिथेही त्यांना अस्वस्थ वाटून ते कोसळले. यानंतर त्यांना कोलकाता मेडीकल रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे दाखल करण्यात आले. पण काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके यांची मुलगी तामारा हिने अंत्यसंस्कार संदर्भात एक पोस्ट शेअर करत तिने एक मेसेज लिहिला आहे

तमाराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचे वडील केके यांच्या अंत्यसंस्काराचे फोटो शेअर केले. त्यासोबत “लव्ह यू फॉरएव्हर डॅड” असा मेसेज लिहित एक रेड हार्ट इमोजी टाकला आहे. तिने तिच्या इंस्ग्राटाम प्रोफाईलवर स्वतःला गायिका, संगीतकार आणि निर्माती म्हटले आहे.

केके यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूड तसेच राजकीय क्षेत्रातूनही अनेक दिग्गजांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!