Share

आयपीएलमध्ये राशिद खानच्या ‘स्नेक शॉट’ने घातला होता धुमाकूळ, तो पुन्हा सराव करताना दिसला; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : गुजरात टायटन्सचा स्टार खेळाडू राशिद खानने आयपीएल २०२२ मध्ये चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात राशिदने असे अनेक शॉट्स खेळले, जे पाहून क्रिकेट चाहत्यांसह समालोचकही थक्क झाले होते. सामन्यानंतर राशिद खानला त्या शॉट्सबद्दल विचारले असता, त्याने त्याचे नाव स्नेक शॉट असे ठेवले होते.

आता पुन्हा एकदा त्याचा स्नेक शॉटचा सराव करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो ‘स्नेक शॉट’ खेळण्यात कसा यशस्वी झाला हे त्याने उघड केले आहे. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूने गोल्फ स्टिक पकडत असताना मारलेल्या शॉटची कॉपी करत स्वत:चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो महेंद्रसिंग धोनीच्या हेलिकॉप्टर स्टाईलने शॉट खेळताना दिसत आहे. व्हिडिओसोबत राशिदने ट्विट केले आहे की, “हेलिकॉप्टर यूएईमध्ये उतरले आहे.” त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

२३ वर्षीय राशिदने फलंदाजीने अद्भुत कामगिरी केली होती. त्याने चेन्नई विरुद्ध २१ चेंडूत ४० आणि हैदराबादविरुद्ध ११ चेंडूत ३१ धावांची मॅच-विनिंग खेळी खेळली होती. आयपीएलच्या सुरुवातीला त्याला त्याच्या गोलंदाजीवर टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र त्याने पुनरागमन केले आणि हंगामात १९ बळी मिळवले. इतकेच नाही तर त्याच्यासारखे अनेक मॅच फिनिशर आहेत, ज्यांच्यामुळे गुजरातचा संघ पहिल्याच सत्रात चॅम्पियन बनला.

रशीदची राजस्थानविरुद्धच्या अंतिम सामन्यात कामगिरी
आयपीएल २०२२ च्या राजस्थानविरुद्धच्या अंतिम सामन्यात राशिद खानने ४ षटकात १८ धावा देत १ बळी घेतला होता. गुजरातच्या भक्कम गोलंदाजीसमोर राजस्थानचा संघ केवळ १३० धावाच करू शकला आणि गुजरातने हा सामना ७ गडी राखून जिंकला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!