मुंबई : भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आयपीएल २०२२ मधील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. या संघात त्याने राहुल त्रिपाठी आणि उमरान मलिक या खेळाडूंना स्थान दिले आहे. या दोनही खेळाडूंची कामगिरी या आयपीएल हंगामात चांगली राहिली होती. हरभजन सिंगने हार्दिक पांड्याला त्याच्या संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. तसेच संघात त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना स्थान दिले आहे. त्याने राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे.
जोस बटलर हा आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. दुसरीकडे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये केएल राहुल दुसऱ्या स्थानावर राहिला होता. हरभजन सिंगने तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाज राहुल त्रिपाठीची निवड केली आहे. यंदाच्या मोसमात त्याने १४ सामन्यांत ४१३ धावा केल्या होत्या. हरभजनने पाचव्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनची निवड केली आहे. लिव्हिंगस्टोनने यंदाच्या हंगामात चांगली फलंदाजी केली आहे.
हरभजन सिंगने हार्दिक पंड्याला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. त्याचबरोबर बंगळुरूच्या दिनेश कार्तिकची संघाचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून कोलकाताच्या आंद्रे रसेलचीही निवड केली आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे तर त्याने युझवेंद्र चहल आणि राशिद खान या फिरकीपटूची निवड केली आहे. दुसरीकडे उमरान मलिक आणि जोश हेझलवूड या दोन वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. मोहम्मद शमीला हरभजन सिंगने १२ वा खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे.
हरभजन सिंगची बेस्ट इलेव्हन
जोस बटलर, केएल राहुल, राहुल त्रिपाठी, लियाम लिव्हिंगस्टोन, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), आंद्रे रसेल, युझवेंद्र चहल, रशीद खान, उमरान मलिक, जोश हेझलवूड आणि मोहम्मद शमी (१२वा खेळाडू).
महत्वाच्या बातम्या:


