Share

आयपीएल २०२२ जिंकल्याने हार्दिक पंड्याला मिळाले ‘हे’ खास बक्षिस; पाहा PHOTO!

Published On: 

मुंबई : हार्दिक पंड्याने आयपीएल २०२२ मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. दुखापतीनंतर तो आयपीएलद्वारे मैदानात परतला होता. यंदाचा हंगाम त्याच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे. गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने पहिल्याच सत्रात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याच्या संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करून पदार्पणाच्या मोसमात चॅम्पियन बनले. हार्दिकने अंतिम सामन्यातही दमदार कामगिरी केली होती. त्याने या सामन्यात ३४ धावांची खेळी खेळली आणि ३ बळी मिळवले होते. यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आता हार्दिकला आयपीएल विजेतेपद जिंकल्यामुळे एक खास भेट मिळाली आहे. त्याचा फोटो हार्दिकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

हार्दिकला एक कस्टमाइज पेंडंट भेट म्हणून मिळाले आहे. ज्याच्या एका बाजूला गुजरात टायटन्स आणि दुसऱ्या बाजूला आयपीएल २०२२ चॅम्पियन्स लिहिलेले आहे. हार्दिकला हे गिफ्ट मिळाल्याने खूप आनंद झाला असून त्याची पत्नी नताशा हिने या संदर्भात एक व्हिडिओ देखील बनवला आहे. ज्यामध्ये पार्श्वभूमीत गुजरात टायटन्सचे गाणे ऐकू येत आहे.

हार्दिकने ४८७ धावा आणि ८ बळी घेतले
हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ च्या लीग टप्प्यात १४ पैकी १० सामने जिंकले. त्यानंतर पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यातही हार्दिकने चेंडू आणि बॅटने चमकदार कामगिरी केली होती. त्याने या सामन्यात १ बळी घेतला व नाबाद ४० धावा केल्या. त्याने अंतिम फेरीतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करत ३ बळी घेतले. हार्दिकने त्याच्या कामगिरीने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवले. त्याने १५ सामन्यात ४४ च्या सरासरीने ४८७ धावा केल्या. आयपीएलच्या १५व्या हंगामात हार्दिकने ४ अर्धशतकेही झळकावली होती. याशिवाय त्याने ८ बळी मिळवले आहेत.

हार्दिक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दिसणार
हार्दिक आता ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे.भारतीय संघालाही हार्दिकचा फॉर्म आणि फिटनेस दोन्ही चांगली राहण्याची आशा असणार आहे. कारण या वर्षाच्या अखेरीस टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे आणि हार्दिक भारतासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!