बुलढाणा : औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून नामांतर करण्याचं आवाहन केलं आहे.
पडळकर यांनी पत्रातून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दुसरीकडे या पत्रावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचा नाव न घेता तोंडसुख घेतले आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गुरुवारी ते खामगावात आले असता बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
