मुंबई : आयपीएल २०२२ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक राहिली होता. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईला आयपीएलच्या या हंगामात केवळ ४ सामन्यात विजय नोंदवता आला. एवढेच नाही तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई पहिला संघ ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा हा सर्वात खराब मोसम होता. पण मुंबईसाठी या हंगामातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे टिळक वर्मा, टीम डेव्हिड आणि डेवाल्ड ब्रेव्हिस सारख्या काही युवा फलंदाजांनी आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या युवा खेळाडूंनी संघाला आशा दिली की ते पुढील हंगामात आणखी चांगल्या पद्धतीने पुनरागमन करतील.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा विचार केला तर तिलक वर्मा सर्वात यशस्वी ठरला. संपूर्ण मोसमात त्याने १४ सामन्यांत ३६ च्या सरासरीने ३९७ धावा केल्या. प्रशिक्षक महेला जयवर्धनेपासून कर्णधार रोहित शर्मापर्यंत सर्वांनी तिलक वर्माचे कौतुक केले आहे. तिलक लवकरच भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार असल्याचे काही माजी खेळाडूंनी सांगितले होते.
मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी लिलावात त्याला १.७ कोटी रुपये मिळाले. तिलकने एका मुलाखतीत सांगितले की, विचलित होऊ नये म्हणून त्यांनी आयपीएलमध्ये मिळालेले सर्व पैसे वडिलांना दिले. तो म्हणाला की, “पैशामुळे विचलित होणे सोपे आहे म्हणून मी माझे सर्व पैसे माझ्या वडिलांना दिले आणि पैशांना माझ्यापासून दूर ठेवण्यास सांगितले.”
तिलक वर्मा हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहे. त्यांचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत हे विसरता कामा नये. त्याला त्याच्या प्रशिक्षणासाठी अन्नही सोडावे लागले. मात्र, या पैशातून एक कार घ्यायची तिलकची इच्छा आहे. त्याला एक कार खरेदी करायची आहे जेणेकरून तो बसमधून प्रवास टाळू शकेल आणि आरामात प्रशिक्षणासाठी जाऊ शकेल. तो म्हणाला की बसमधील लोक मोठ्या किट बॅगमुळे त्याच्याबद्दल खूप तक्रारी करायचे.
महत्वाच्या बातम्या:


