पिंपरी चिंचवड : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात आल्यानंतर आता सर्वत्र बैलगाडा शर्यतीचे आयोजन दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन मोठया उत्साहात केले जात आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यामुळे बैलगाडा शर्यत प्रेमी आनंदात आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांनी भोसरी या विधानसभा मतदारसंघात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीच्या कार्यक्रमाला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली.
यावेळी देवेंद्र यांनी फडणवीस म्हणाले, “आज मोठा उत्साह दिसत आहे. या शर्यतीसाठी दीड कोटी रुपयांची बक्षिसे आहेत आणि इतरही लाखोंची बक्षिसे आहेत. यावेळी त्यांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटातील एक डॉयलॉग देखील उपस्थितांना ऐकवलं. फडणवीस म्हणाले, “बैल कधीच एकटा येत नाही, तो जोडीने येतो, ते ही नांगरासकट. बैल सोबत नांगर घेऊन येतो, या वाक्याला उपस्थित लोकांनी दिलखुलास दाद दिली.
पुढे फडणवीस म्हणाले, “मला नवीन ड्रेस शिवून दिल्याबद्दल आमदार महेश लांडगे यांचे खूप आभार. हा नवीन ड्रेस म्हणजे, पाहुण्यांना झूल घालून आणले, असे फडणवीस म्हणाले व उपस्थित जनसमुदायामध्ये एकाच हशा पिकला. सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवू लागले. “बैल हा पळणारा प्राणी आहे तसा अहवाल सर्वोच्च न्यायालयात आम्ही सादर केला. म्हणून बैलगाडा शर्यत सुरू झाली”. असेही ते म्हणाले. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

