Share

“आयपीएल २०२२ ने हार्दिक पंड्याच आयुष्यच…” ; माजी क्रिकेपटूच मोठं वक्तव्य!

Published On: 

मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रितेंदर सिंग सोधीने आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील हार्दिक पंड्याच्या कामगिरीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, हार्दिककडे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध करण्याची एकच संधी उरली होती. हार्दिक ने या संधीचे सोने करत आयपीएल २०२२ गुजरात संघाचे कर्णधारपद ही सांभाळले. स्वतःच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत आई प्रचंड मेहनत घेतली. शेवटी हार्दिक च्या चांगल्या कामगिरीमुळे गुजरात संघाने आयपीएल चे विजेतेपद पटकावले. त्यामुळे यंदाच्या आयपीएलने हार्दिकचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले आहे.

आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले होते. त्यांच्या या निर्णयावर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, त्याने आपल्या कामगिरीने सर्व प्रश्नांची उत्तरे देत आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. संघ संपूर्ण हंगाम अवघ्या चार सामन्यांमध्ये पराभूत झाला. यावरूनच हार्दिक पंड्याने संघाचे नेतृत्व किती चांगले केले आहे हे दिसून येते.

इंडिया न्यूजशी बोलताना रितेंदर सिंग सोधी म्हणाले की, “हार्दिक पांड्यासाठी आयपीएल ही शेवटची संधी होती आणि त्याने स्वत:ला सिद्ध केले. आयपीएल २०२२ मुळे जर कोणाचे आयुष्य बदलले असेल तर ते हार्दिक पंड्याचे आहे. त्याने त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीद्वारे जबरदस्त कामगिरी केली. हार्दिकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तो खूप संघर्ष करत होता आणि त्याचे भारतीय संघात पुनरागमन करणे खूप कठीण झाले होते. त्याच्याकडे यंदाच्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी करणे हा एकमेव पर्याय उरला होता. यानंतर हार्दिकने आयपीएल २०२२ च्या रूपाने पुन्हा एकदा भारतीय संघात दमदार पुनरागमन केले आहे.”

हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील नंबर वन ऑलराउंडर मानला जात होता. फलंदाजीसोबतच तो गोलंदाजीही करत असे. वारंवार दुखापतींमुळे त्याला गोलंदाजीपासून दूर राहावे लागले आणि तो बराच काळ संघाबाहेरही असला तरी आता त्याने आयपीएलच्या माध्यमातून शानदार पुनरागमन केले आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याची कामगिरी चांगली झाली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!