Share

कानपूरमध्ये मोदींच्या दौऱ्यादरम्यान दोन समुदायांमध्ये राडा! ; पोलिसांचा लाठीचार्ज

Published On: 

कानपूर : कानपूरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान आज दोन समुदायांमध्ये जोरदार दगडफेक झाली. कानपूरमधील परेड स्क्वेअर येथे मुस्लिम समाजातील काही लोकांनी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ दुकाने बंद केली. त्यानंतर वाद निर्माण झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर जमा झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा मागवण्यात आला होता.

शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कानपूरच्या बीकनगंज परिसरात गोंधळ झाला. हजाराहून अधिक लोक रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. कानपूरचा हा परिसर संमिश्र लोकवस्तीचा आहे. दगडफेकीत आतापर्यंत 6 जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मुस्लिम भागात बंदची हाक

मुस्लीम भागातील सामाजिक संघटना बंदच्या घोषणेने या प्रकरणाला सुरुवात झाली. शुक्रवारच्या नमाजामुळे परेड चौकात शेकडो लोक जमले होते. खरे तर भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील चर्चेदरम्यान प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज संतप्त झाला होता. मुस्लिम भागात बंदची हाक नेते हयात जफर हाश्मी यांनी दिली होती.

 कानपूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण 

यावेळी लोक रस्त्यांवर अधूनमधून दगडफेक करत आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. संशयाच्या आधारे काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनीच बाजार बंद ठेवला आहे. कानपूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींच्या आगमनामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना हा गोंधळ झाला. पंतप्रधान, राष्ट्रपतींसोबत शहरापासून सुमारे 70 कि.मी. दूर एका कार्यक्रमात हजर आहेत.

पोलिसांनी केला लाठीचार्ज 

दगडफेक सुरू असताना बाजारपेठेत लोक उपस्थित होते. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे 12 पोलिस ठाण्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर लोकांनी तेथून पळ काढला. मात्र, आता परिस्थिती सामान्य असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!