Share

“…बॉबी देओलसोबत बोल्ड सिनचा ईशा गुप्ताने सांगितला अनुभव” ; म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  ‘आश्रम ३’ ही वेबसीरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. यामध्ये अभिनेता बॉबी देओल ‘बाबा निराला’च्या भूमिकेमध्ये दिसत आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी खूप जास्त प्रेम दिले आहे. आता वेबसीरीजच्या तिसऱ्या भागात ईशा गुप्ता महत्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहे. तिसऱ्या भागामध्ये बरेच बोल्ड आणि इंटीमेट सिन आहेत.

वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यांच्या बोल्ड सिनची चर्चा सोशल मिडीयावर झाली होती. एका मुलाखतीमध्ये ईशाने शूटच्या वेळीचे अनुभव सांगितले आहेत. ती म्हणाली, “असे सीन करताना कम्फर्टेबल असण्याचा किंवा नसण्याचा काही प्रश्न नाही. जेव्हा तुम्ही १० वर्षं या क्षेत्रात काम करत असता तेव्हा असे सीन शूट करताना तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा शंका नसते. मोठ्या पडद्यावर इंटिमेट सीन बऱ्याच लोकांना खूप मोठी गोष्ट वाटते. पण याबाबतीत मी खूप मोकळ्या विचारांची व्यक्ती आहे.”

ईशा गुप्ता म्हणाली, “जेव्हा पहिल्यांदा असे सिन शूट केले तेव्हा कठीण वाटल. पण आत्ता काहीच नाही वाटत. जेव्हा तुम्ही चांगल्या आणि समजदार व्यक्तीसोबत काम करता तेव्हा तुम्हाला कोणतीच अडचण येत नाही”. ‘आश्रम ३’ मध्ये ईशा गुप्ता एका बिल्डरच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरीजमध्ये ती बॉबी देओलशी जवळीक साधताना दिसत आहे. वेबसीरीमजधील ईशा गुप्ताच्या बोल्ड सिनची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!