मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने भारताच्या कसोटी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘जर हनुमा विहारीला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल आणि सातत्याने संघात खेळायचे असेल तर त्याला मोठी धावसंख्या करावी लागणार आहे. त्यामुळे ५०-६० धावा करून काम होणार नाही. जर हनुमा विहारीबद्दल बोललं तर तो भारतीय संघाचा सातत्याने भाग राहिलेला नाही. तो संघात पुनरागमन करतो पुन्हा संघाबाहेर जात आहे. गेल्या साडेतीन वर्षात त्याने केवळ १५ कसोटी सामने खेळले आणि ३५.१३ च्या सरासरीने ८०८ धावा केल्या आहेत.
हनुमा विहारीची इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या पूर्वनियोजित कसोटी सामन्यासाठी १७ सदस्यीय भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. बर्मिंगहॅम येथे १ जुलै ते ५ जुलै दरम्यान हा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. मागील वर्षी इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला होता.
हनुमा विहारी ला संघात कायमचे स्थान मिळविण्यासाठी मोठी खेळी करावी लागेल
खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या मते, ‘हनुमा विहारीसाठी इंग्लंडविरुद्धचा सामना ही मोठी संधी आहे. त्याला नशिबाने या सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यास जास्तीत जास्त धावा करून त्याचा फायदा घ्यावा.’
अझरुद्दीन म्हणाले, “हनुमा विहारीसाठी मोठी धावसंख्या करणे खूप महत्त्वाचे आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी त्याला शतक झळकावे लागणार आहे. त्याला आता ५०-६० धावा करून फायदा होणार नाही. हनुमा विहारी हा प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र त्याने सातत्याने मोठी धावसंख्या केली तरच तो भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

