अमरावती : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीने नोटीस दिल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. या संदर्भात काँग्रेस नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी माध्यमांशी बोलताना अमरावतीत प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकार सातत्याने ईडीचा दुरुपयोग करत आहेत, आता आमच्या नेत्यांना ईडी नोटीस देऊन त्यांच्यावर सुद्धा दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण याला आम्ही घाबरत नाही पण जे काही देशात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकुर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

